एखादा मराठी शब्द पुल्लिंगी आहे म्हणून त्याच वस्तूच्या इंग्लिश शब्दाचेही लिंग पुल्लिंगी असावे असे जरूरी नाही. एकाच वस्तूला (सुदैवाने) इंग्लिश आणि मराठी शब्द असतील तर दोन्ही शब्दांची मराठी भाषेत वेगळी लिंगे असू शकतात.
तो ट्रक = ती गाडी
ती लोकल = ती गाडी
तो गॅस = ती चूल
तो सोलर-कुकर = ती सूर्यचूल
ते इंजेक्शन = ती लस किंवा ती सुई
ती कॅपस्यूल (औषधाची)= ती गोळी
ते पेट्रोल = ते इंधन
ते तिकिट = ती प्रवेशिका
तो ड्रम = तो हौद (पाण्याचा)
तो ड्रम = तो ढोल (वाजवण्याचा)
तो डॅम = ते धरण
तो कॅनाल = तो कालवा
ते सेक्शन = ते कलम (कायद्याचे)
तो पोलिस = तो शिपाई
म्हणून "विरोप" पुल्लिंगी असला तरी ई-मेल पुल्लिंगी असायलाच हवे असे जरूरी नाही.
===
घटक शब्द पुल्लिंगी म्हणून सदरहू शब्द पुल्लिंगी या युक्तिवादाशी संपूर्णतः असहमत. एखाद्या शब्दाच्या/वस्तूच्या लिंगाचे त्यातील घटक शब्दांच्या लिंगांशी काही संबंध आहे असे वाटत नाही.
तो रस्सा + ती भाजी = ती रस्सा-भाजी
===
एखाद्या शब्दाच्या/वस्तूच्या लिंगाचे त्यातील घटक पदार्थांच्या शब्दांच्या लिंगांशी काही संबंध आहे असे वाटत नाही. (तुमचा मुद्दा हा नाही. तुमचा मुद्दा संधी बाबत आहे. तरीही सुचले म्हणून लिहिले आहे.)
तो खिळा + ते लाकूड = तो पाट
तो डबा + ते इंजीन = ती आगगाडी
तो कांदा + तो बटाटा = ती भाजी
तो कांदा + तो बटाटा = तो रस्सा
तो कांदा + तो बटाटा = ती रस्सा-भाजी
तो धागा + ते कापड = तो सदरा
तो धागा + ते कापड = ती चोळी
तो धागा + ते कापड = ते निशाण
तो धागा + ते कापड = तो ध्वज