सजगता, पैसा आणि समृद्धी असं होईल.

१) सजगता म्हणजे 'विचार आणि वस्तुस्थिती' यात फरक करता येण्याची क्षमता आणि हा जाणीवेचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे त्यामुळे तुम्ही मनाच्या हेलकाव्यातून मुक्त होता. कोणताही लोक तुम्हाला वर्तमानातून विचलित करत नाही कारण हे सहाही लोक वेगवेगळे विचार आहेत. 

२) पैशाविषयी मी सविस्तर लिहिलंय पण एक अगदी महत्त्वाची गोष्ट आता सांगतोः

'जेवढा खर्च झाला तेवढाच पैसा उपयोगी झाला' हा नियम आहे. आपण नेहमी बॅलन्सकडे बघतो त्यामुळे हा अँगल यायला वेळ लागतो.

तुम्ही जर सजग असाल तर प्रत्येक खर्च तुम्हाला सुख देतो कारण तुम्ही योग्य कारणासाठी योग्य तेवढाच पैसा खर्च केलेला असतो!

३) समृद्धीचा एकमेव उपाय म्हणजे मालकीची कल्पना सोडून प्रत्येक प्रसंगात उपयोग आणि सहजता बघणे.

समजा तुमच्या मित्राचा व्हिला आहे आणि त्यानी तुम्हाला रहायला बोलावलं आहे. आता या ऐयाशीत दोन्ही कुटुंबांना मजा हवी असेल तर आपण कुठे आणि हा कुठे असा विचार करण्या एवजी आणि कोणताही कमीपणा न वाटून घेता, आहे तो प्रसंग कसा रंगवता येईल असं बघीतलं तर मित्रालाही तुमच्यात रस निर्माण होतो आणि मग व्हिला कुणाचा, लिमोझीन कुणाची वगैरे प्रश्न गैरलागू होऊन सगळे एक होतात आणि मजा येते कारण मजेला मालकी नसते मजा सर्वांची असते ..आणि मजा म्हणजे प्रत्येकाला तीच हवी असते!

संजय