खरंतर प्रत्येकानी स्वानुभवानी स्वत:साठी जीवनाचं तत्त्वज्ञान व धर्म शोधून काढायला हवा. गांधींचं तत्त्वज्ञान फक्त गांधींसाठीच योग्य आहे. येशू ख्रिस्ताच्या धर्माची उपयुक्तता त्याच्यापुरतीच मर्यादित आहे. महम्मद पैगंबरानी स्थापलेला धर्म फक्त त्याच्यासाठीच उपयुक्त आहे. बुद्धानी स्थापलेल्या धर्माचेही तेच. कोणीही दुसऱ्याचं तत्त्वज्ञान व दुसऱ्याचा धर्म आंधळेपणानी उचलू नये.