क्षीरसागर साहेब मी कालच आपले बरेच लेख आणि प्रतिक्रिया आवडीने वाचून काढल्या. त्यापैकी एक लेख होता - "पैसा". आपण त्या लेखात आपला दृष्टीकोन व्यक्त केला आहेतच. तसेच वरती आपण म्हणालात- >>'जेवढा खर्च झाला तेवढाच पैसा उपयोगी झाला' हा नियम आहे. आपण नेहमी बॅलन्सकडे बघतो त्यामुळे हा अँगल यायला वेळ लागतो.>> मला हा आपला मुद्दा पटला नाही कारण पुढीलप्रमाणे - (१) बँक बॅलन्स हा मानसिक सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. पैशाची जी ऊब म्हणतात ती म्हणजे हा बॅलन्स. उद्या माझ्यावर काही संकट ओढवले तर मी रस्त्यावर येणार नाही याची खात्री मला माझ्या फुगलेल्या बँक बॅलन्समुळे वाटते हेही नसे थोडके. (२) मला विचाराल सर्वात दुःखदायक काय असू शकेल तर मी उत्तर देईन - माझ्या जवळच्या व्यक्तीला व्याधी झाली आहे आणि केवळ पैशाअभावी मी पाहत राहण्याखेरीज काही करू शकत नाही. अशा प्रसंगामध्ये बँक बॅलन्स का हवा याचे महत्त्व कळते.