विसंबायची सवय लागली की मग बँक बॅलन्स असो की नसो सॉलिड कॉन्फिडन्स असतो कारण कोणत्याही प्रसंगातून आपण मार्ग काढू शकू ही खात्री असते, सगळं अस्तित्व तुमच्या साथीला असतं.
बँक बॅलन्सला उब आहे पण प्रसंग जर त्या बॅलन्स पेक्षा मोठा असेल तर ती नाहीशी होईल आणि केव्हा काय होईल ते इथे काही सांगता येत नाही म्हणून वर्तमान ही सर्वोच्य सिक्युरिटी आहे आणि त्यात जगणं सर्वात श्रेयस आहे.
हा वर्तमान म्हणजेच 'स्व', खुद्द आपण, म्हणजेच निराकार! तेच आपल्या सगळ्यांचं स्वरूप आहे, स्वरूप एक आहे आणि नित्य आहे. बँक बॅलन्सला काहीही झालं तरी याला काही होत नाही ...आणि ते 'अनंत' आहे त्याच्या बोधानी तुम्ही समृद्ध होता मग संपत्ती असो, नसो त्यानी काही फरक पडत नाही! त्या निराकराला शोधा एका बोधा सरशी जीवनाचा सगळा रंग बदलतो, साठवत जगण्या एवजी उधळत जगण्याची मजा कळते.
मी ही तुमच्या सारखाच आहे आणि तुमच्याच जगात जगतोयं, सारीका, साहेब वगैरे फार होतं, सत्य कळणं म्हणजे काही विशेष नाही, तुम्हाला सुद्धा स्वछंद जगण्याची मजा यावी म्हणून लिहितोयं बाकी काही नाही.
संजय