नुसते इकारच नाहीत तर उकारसुद्धा दीर्घ उमटले आहेत.  उदाहरणार्थ : अयि, मधु, रिपु, शत्रु, किमु, ननु वगैरे.  टंकलेखन करताना शुद्धिचिकित्सक बंद ठेवायला हवा होता. झालेल्या चुका माझ्या लक्षात आल्या होत्या, पण त्या संपादित करण्यापूर्वी संगणकात काहीतरी गडबड झाल्याने काम राहून गेले.
एकाच पदातले शब्द तोडून लिहिणे खरोखर अयोग्य आहे.  वाचण्याच्या सोयीसाठी मी तसे केले पण मधल्या जागा 'डॅश' वापरून भरायला हव्या होत्या.
लिखाणातले दोष दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!