मी ग्रीव्हन्स सेल (दुवा क्र. १) ला पुढे ईमेल द्वारे उत्तर दिले की :
"जर का चार तासांत मोबाईल चालू झाला नाही तर मी न्यूज चॅनेल कडे सांगेन. तेथे माझ्या ओळखी आहेत.
आणि चौथ्यांदा मी डोक्युमेंट सबमीट करण्या आधी माझी या आधीची तीन वेळा दिलेली डॉक्स कुरियरने परत पाठवा.
आणि मी ग्राहक मंचा कडे चाललो आहे. "
... खरेच चार तासांच्या आत नंबर सुरू झाला आणि त्यांनी कबूल केले की तुमची कागदपत्रके आमचे कडे आहेत.
पण....
मग या आधी जे काय होते ते कशासाठी होते हे कळायला मार्ग नाही.
आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण या चर्चेत भाग घेवून विविध अनुभव शेअर केले, त्या अनुषंगाने विविध उपयुक्त माहिती एकमेकांना कळली.
सध्यातरी नंबर चालू आहे.
पुढे बघू या...