परखड महाशय, प्रशासक महाराज आणि सहभागी मनोगती,

शुद्धलेखनाविषयी आपण मांडलेले मुद्दे आणि दिलेली माहिती दोन्ही अतिशय उपयुक्त आहे. ह्याविषयी आणखी थोडेसे -

उदा० ॐकाररावांनी इतरत्र दिलेला नियम -

ठे - ठेवू
जा - जा

हा नियम लक्षात घेतला तर अनेक मंडळींचे शुद्धलेखन अचानक बऱ्याच प्रमाणात सुधारेल असे वाटते.

मनोगती हो, प्रशासक महाराजांनी एवढ्या कष्टाने बनविलेल्या शुद्धलेखन चिकित्सकाचा वापर कितीही कंटाळा आला अथवा वेळ गेला तरी शक्यतो प्रत्येक लेखासाठी व प्रतिसादासाठी न चुकता करावा ही आग्रही विनंती!

आपला
(शुद्धलेखनवादी) प्रवासी