वाहनांच्या दोन भिन्न प्रकारापैकी मोटार, कार वगैररेंपेक्षा ट्रक मोठा म्हणून तो पुल्लिंगी.
संदेशवाहनांच्या प्रकारातले सर्वात छोटे चिठोरे. ते नपुंसकलिंगी. त्याहून मोठी चिठ्ठी. ती स्त्रीलिंगी. आणि तिच्याहून मोठा ई-मेल. तो पुल्लिंगी. (येथे पत्र विचारात घ्यायचे कारण नाही, कारण तो शब्द संस्कृत आहे. चरर्चा मराठी शब्दांच्या लिंगांबद्दल आहे.
कमान हे सामान्य नाम आहे. ते मराठीत स्त्रीलिंगी आहे, म्हणून आर्च स्त्रीलिंगी. यांत वाद होण्याचे काही कारण नाही. पण एखाद्या भल्यामोठ्या कमानीला जर कुणी गंमत म्हणून विनोदाने तो आर्च म्हटले, तर ते गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. बुंदीच्या लाडवातील बुंदी जर प्रमाणाबाहेर मोठ्या असल्या, आणि म्हणून त्या लाडवाला जर कुणी बुंद्याचा लाडू म्हटले तर तो व्याकरणशुद्ध विनोद समजला जाईल, तसाच तो आर्च!