आजच्या आय्‌बीएन लोकमतवर विखे पाटलांच्या मुलीच्या लग्नाची बातमी पुन्हापुन्हा दाखवत आहेत.  बातमी दाखवताना खाली एक तळटीप वारंवार येते आहे.  "मंत्री झालं बिझी".  हा कर्तरी प्रयोग आहे, म्हणजे क्रियापद कर्त्यानुसार. झालं  नपुंसकलिगी, म्हणून मंत्रीसुद्धा तसेच.
नामांना नपुंसकलिंगी करायची फॅशन आली आहे हेच खरे.  हिंदीचे एक बरे आहे. त्या भाषेत नपुंसकलिगच नाही.