अहाहा! लेख वाचून लहानपणाच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या.
आमच्या घराजवळच्या देवळात असाच काकडा व्हायचा. त्यावेळी सहामाही परीक्षा नुकतीच संपलेली असायची आणि दिवाळीचा उत्साहसुद्धा असायचा. मग मीसुद्धा सकाळी लवकर उठून, अंघोळ वगैरे आटोपून माझ्या आजीसोबत काकड्याला जायचे. ती सर्वांनी एकसुरात गायलेली नादमधुर आणि भावपूर्ण गाणी, टाळ-झांजा चा आवाज या साऱ्या गोष्टींचं फार आकर्षण होतं मला. गवळणी ऐकायला तर खूपच आवडायचं. दिवाळीच्या दिवशी श्रीकृष्णासाठी फराळाचं ताट मीच घेऊन जाणार असा माझा बालहट्ट असायचा आणि तो पूर्णही व्हायचा
गेले ते दिन गेले! आता फक्त त्या प्रतिमा मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात जपून आहेत.
खरंच, याशिवाय आणखी काय करू शकतो आता!!
अवांतर: 'अंघोळ' हा शब्द योग्य आहे की 'आंघोळ'? मनोगतच्या शुद्धलेखन चिकित्सकाने 'आं'घोळ चे 'अं'घोळ केले. परंतु मी आजवर 'आंघोळ' हेच बरोबर समजत होते.