आशुतोश,
विचार आणि त्यांच्या योग्य मांडणीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
तुमच्यावरचा ताण हा या लेखाचा गाभा आहे, असंच मी म्हणेन.
संजयजी,
नेहमीसारखाच आजही मी आपल्या मतांशी सहमत आहे.
पण सद्य परिस्थिती आणि तिची वाटचाल पाहता... आजचा तरूण वर्ग कामाचा कोणताही ओघ यशस्वीपणे झेपतोच आहे.
फक्त त्याच्या व्यक्तिमत्वाला इतर पैलू शिल्लकच राहिलेले नाहीत, हे तितकंच त्रिकालाबाधीत सत्य आहे.
वैयक्तिक, कौटुंबिक तथा सामाजिक भविष्यकालीन परिणामांकडे थोडं दूर्लक्ष केल्यास देशाच्या सध्याच्या चलनवाढीला (आणि महागाईलाही! ) हाच कष्टकरी वर्ग जबाबदार आहे आणि 'वचनपूर्ती'वरच 'भारतीयत्व' टिकून आहे.
ही 'स्पर्धा' जीवघेणी ठरत असली, तरी तिनेच सामाजिक राहाणीमान उंचावले आहे. तेवढीच आर्थिक विषमता आली आहे, हे ही तितकंच खरं!
थोडक्यात काय, तर एकाच नाण्याच्या या दोन बाजू दिसतात.
आपण सुचवलेले उपाय बेलाशक परिणामकारक असले आणि दीर्घकालीन अष्टपैलू यशाची निश्चिंती देणारे असले, तरी ते व्यवहारी वाटत नाहीत. (कृपया कोणताही गैरसमज करून घेऊ नये. ) एक मत म्हणून मांडतो...
शालेय, महाविद्यालयीन तथा व्यावसायिक पातळीवर ही स्पर्धा अशीच सुरू राहण्यात देशाचा फायदा आहे. (त्याबरोबर तोटे ओघाने आलेच. )
पण सध्या क्षमतेपेक्षा अधिक काम करणारा तरूण वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षीपर्यंत अशा प्रकारचं काम सतत करण्यात धन्यता मानणार नाही... कितीही इच्छा असली तरीही... आणि मग तो यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागेल.
आशुतोशना व्यक्त करावासा वाटणारा ताण उद्या त्यांना या दुनियेतून बाहेर यायला उद्युक्त करेल. तोपर्यंत त्यांनी आपला वैयक्तिक आणि कौटुंबिक दर्जा आर्थिक पातळीवर उंचावून ठेवलेला असेल आणि ते इतर पैलूंचा विचार सुरू करतील. माझ्या मते ही परिस्थिती सर्वांच्याच फायद्याची आहे.