मराठी शुद्धलेखनाविषयी सगळीकडेच अनास्था दिसून येते. येथे चाललेले प्रयत्न स्तुत्य आहेत. मराठी आपण जर बोलत शुद्ध असलो तर लेखनही शुद्ध व्हावे.
मला शब्दांच्या ऱ्हस्व दीर्घ लेखनातून नेहमी विशिष्ट भावना व्यक्त होतात असे वाटते. उदाहरणार्थ, भीती हा शब्द दीर्घ लिहिला गेला नाही तर त्याची तीव्रता कमी झाल्यासारखी वाटते. उच्चारानुसार ऱ्हस्व दीर्घ तर कळतातच.
तसेच सूर्य हा शब्द सुर्य लिहिला की उगाचच मळभ दाटून आल्यासारखे वाटते.तसाच कीर्ती , हा शब्द ऱ्हस्व लिहिला की तो उदंड कीर्तीचा नाही वाटत.
मी, तू ,ही सर्वनामे देखील ऱ्हस्व लिहिलेली वाचनात आली की लगेचच चुकल्यासारखे वाटते. शुद्धलेखन शुद्ध उच्चारांप्रमाणे जसे आहे,तसे काही विशिष्ट भावना व्यक्त होण्याचे सामर्थ्यही त्यात आहे, असे मला वाटते. जाणकारांचे काय मत आहे ह्यावर?