मला समाज सुधारणेकडे लक्ष वेधायचे नाही.. किंवा कोणाला दुखवायचे, नमवायचे, आकर्षित करायचे नाही... इथे सगळे सुज्ञ आहेत आणि आपापले आयुष्य सुधारण्यास समर्थ आहेत... पण पेपर मध्ये 'रस्त्यावरचे आयुष्य' ह्या सदरातील "उन्हात उभे राहून डोके दुखते... बसून बसून कंबर अवघडून येते..."वगैरे कॉमेंटस वाचून फक्त एक विचार मांडावासा वाटला...
मी स्वतः खुप ताण-तणावात काम करतो असे नाही.. किंवा सगळे करतात असे पण नाही... फक्त नाण्याची दुसरी बाजु, पैसा सहज मिळत नाही हे सांगते... आणि तेच दाखवले... एक एक पैसा मिळवायला जसा रस्त्यावर घाम निघतो तसाच एअरकंडिशंड ऑफिसमध्ये सुद्धा मेंदुला घाम येतोच... सहज पैसा कोणालाच आणि कधीच मिळत नाही... आय. टि. आणि मी उल्लेखलेल्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक नक्की मानतील की अप्रेझल च्या वेळी कशी पंचायत असते प्रत्येक वेळी !!
एकदा आपण व्यवसाय म्हणून निवडले की उगिचा कांगावे करू नयेत.. कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम.. सोन्याचा चमचा तोंडात घेउन येणारे फक्त ०.५५% असतात .. बाकी लोकांनी कामाचा गवगवा आणि उगिच उरीपोटी बोंबाबोंब करू नये..आजच्या जगात सगळे'च कमाईसाठी त्रास सोसत आहेत.. तेंव्हा "profession is profession.... DONT Complain, if u do...you're out of profession..." आणि मला वाटते ह्यात वावगे काहीच नाही... कंपनी पदरचे पैसे कधीच देत नाही.
एक गमतीचा भाग म्हणून लिहायला घेतले होते, हसत खेळत "रस्त्यावरचे आयुष्य" ला फक्त हे आमचे एक उत्तर आहे... गाऱ्हाणी सांगायची झालीच तर ऑफिस, कार्यालय, कचेऱ्या,रस्ता, कोणताही माणुस शब्द कमी पडतील एवढे बोलतो...... असो, सर्वांना प्रतिसादासाठी धन्यवाद !
-
आशुतोष दीक्षित.