'आजकाल स्पर्धा इतकी वाढली आहे'
'टीकून रहायचे असेल तर हे सर्व करायलाच हवे'
असे म्हणत राहून आपणच ही भूते आपल्या मानेवर बसवून घेतली आहेत.
यातून बाहेर पडायची सुरुवात म्हणून, आपल्या बॉसच्या अपेक्षा योग्य तश्या घडवणे (expectations set करणे) आपल्याला जमवावे लागेल. वर्षाच्या शेवटी मिळणार्या तुटपुंज्या पगारवाढीची चिंता न करता, आणि बॉस फार फार तर १०% चे ४%
करू शकेल, किंवा एखादे प्रमोशन ३ ऐवजी ४ वर्षांनी मिळेल, या पेक्षा अधिक नुकसान करणे त्याला जमणार/परवडणार या विश्वासाने ऑफिस मध्ये जाऊन पाहा.
हळू हळू गोष्टी सुधारतील. कामात हलगर्जीपणा, आळस वगैरे केला नाही, आपले काम नीट केले, फक्त आपले काम कोणते आणि किती हे नीट ठरवले, तर हे सर्व जमू शकेल. आपण केले नाही तर कंपनी बंद पडत नाही.
त्याच जोडीला, किंवा हे जमत नसेल तरीही, आपल्या पुढच्या पीढीला तरी आपण या असल्या स्पर्धेत ढकलू नये.
'देव' (संजयजींच्या मते नाहीये तरीही), ज्याला चोच देतो त्याला दाणाही देतो हे निश्चित.