सहमत!
मराठी संस्थळांच्या शैशवाच्या काळात (सुमारे ४ वर्षांपूर्वीपर्यंत) अशा विषयांवरील चर्चा हिरीरीने लढवल्या जात. आता थोडे जाणतेपण आल्यावर एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी केले जाते किंवा विडंबन तरी!
कारण नथुराम, हिटलर सारख्यांच्या जयंत्या-मयंत्या संस्थळावर कितीही साजऱ्या झाल्या तरी बाह्य जगात त्याचा काहीही परिणाम होत नाही, त्यांचे प्रभावक्ष्रेत्र पूर्वीइतकेच संकुचित राहते, हे नथुराम हिटलर विरोधकांच्या लक्षात आलेले आहे.
'विचारसातत्य हा गाढवाचा सद्गुण आहे'
विशीतील तरुणावर साम्यवादी विचारांचा प्रभाव नसेल तर त्याला हृदय नाही आणि तिशीनंतर्ही तो प्रभाव कायम असेल तर त्याला डोके नाही असे समजावे, असे चर्चिल (चुभुद्याघ्या) म्हणीत असे.
'शेवटचा (एकमेव? ) ख्रिस्ती क्रूसावर मेला'
एक किंचित तपशिलातील चूक. क्रुसावर मेलेला येशू हा शेवटपर्यंत ज्यूच होता. त्याच्या मृत्यूनंतर सेंट पॉल ह्याने ख्रिस्ती धर्माची स्थापना केली, असे समजले जाते. त्यानंतरही जवळजवळ ४ शतके ख्रिस्ती हा ज्यूधर्माचाच एक पंथ म्हणून समजला जात होता.