काकडा म्हणजे काय याची थोडी माहिती सुद्धा द्यावी.

अगदी!

माझ्या आजीच्या घरीसुद्धा काकडा असे. ती तो ष्टो पेटवण्यासाठी वापरी. स्पिरिटमध्ये (डीनेचर्ड किंवा मेथिलेटेड - दारूबंदीच्या त्या जमान्यात याकरितासुद्धा परवाना लागे, आणि त्या परवान्यावर अगदी मर्यादित प्रमाणात मिळे,तरीसुद्धा घरोघरी ष्टो पेटवण्यासाठी हेच वापरत!) बुचकळून पेटवायचा आणि ष्टोच्या बर्नरभोवती ठेवायचा, आणि ष्टो तापला की मग पंप मारायचा, की ष्टोमधून घासलेटचा प्रवाह येऊ लागून तो पेटतो, आणि ष्टो चालू होतो. माझ्या आजीकडे सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत काकड्याचा वापर असे. पहाटेपहाटे आजी पहिला चहा बनवायची तेव्हा ष्टोचा आवाज काय मस्त आसमंतात घुमायचा! माझ्या आजीकडे त्या एकाच ष्टोवर सगळा स्वयंपाक होत असे.

अशा जुन्या, बालपणीच्या स्मृती वगैरे चाळवल्या गेल्या म्हणून लेख मोठ्या उत्साहाने वाचला, तर काय, लेखात काकडा शब्द तर वापरलाय, पण कोठे काकडाही पेटलेला नाही आणि ष्टोही नाही! फसवणूक झाल्यागत वाटले. कदाचित लेखकाच्या मनात दुसरेच काही असावे, पण मग काय ते स्पष्ट करायला नको? (मोल्सवर्थात अर्थ बघूनसुद्धा उपयोग झाला नाही. तेथे दिलेल्या अर्थांपैकी सगळे लावून बघितले, पण काही बोध झाला नाही. )

असो. लेख छानच झाला आहे. सुरुवातीच्या अपेक्षाभंगामुळे तूर्तास वरवरच वाचला. पुढेमागे मनात आले  तर नीट वाचेन म्हणतो.

पुढील लेखनास शुभेच्छा.