कार्तिक महिन्यात 'काकडा' वापरून देवाची पहाटे पहाटे केली जाणारी आरती, म्हणजे काकडा.
काकडा हा एक दिव्याच्या वातीचा प्रकार आहे. नेहमी आपण कापसाची वात वापरतो, त्याऐवजी कापडाची जाड वात वापरली जाते, तोच काकडा. (त्यामुळे टग्या म्हणतो तशी ष्टो पेटवण्यासाठी वापरली जाणारी वात आणि काकडा ह्यात साधर्म्य आहेच) देवीचा गोंधळ घालतात, तेव्हा हातात धरून नाचवतात तो काकडा. काकडा वापरून केलेली आरती, म्हणून 'काकड-आरती' असेही म्हणतात. (काही आगाऊ लोकांच्या मते, थंडीने कुडकुडत, काकडत केली जाणारी आरती, म्हणून काकड-आरती असेही असेल)
ही आरती कार्तिक महिन्यातच का करतात ह्याबद्दल अज्ञ आहे.

@मृदुला, हे देवीचे मंदिर साताऱ्यातलेच. मंगळवार तळ्याजवळचे.