मराठीत 'अ'ने सुरू होणारे काही शब्द 'आ'नेसुद्धा सुरू करता येतात.  अंधळा/आंधळा, अगाऊ/आगाऊ, अगापीछा/आगापीछा, अलुबुखार/आलुबुखार, अवंढा/आवंढा, अंबटचिंबट/आंबटचिंबट, अडखळणे/आडखळणे, अठांगुळे/आठांगुळे, अडकित्ता/आडकित्ता तसाच अंघोळ/आंघोळ.  आंघोळ जास्त वापरला जातो.  मनोगताचा शुद्धिचिकित्सक यास्मि‌न शेख यांच्या शुद्धलेखनकोशावर बेतलेला आहे.  अंघोळीचा अंग या शब्दाशी संबंध असल्याने अंघोळ शुद्ध समजला जावा, असे बहुधा शेखबाईंचे मत असावे.  आपले मत वेगळे असू शकते. बहुतेक कोशांत आंघोळ हाच शब्द सापडतो. 
विठ्ठल, लख्ख, फुफ्फुस असले शब्द यास्मि‌न शेख चुकीचे समजतात आणि त्याऐवजी अनुक्रमे विट्ठल, लक्ख, फुप्फुस हे वापरवावेत असा आग्रह धरतात.  हे मान्य करायलाच पाहिजे असे नाही.  रूढी वेगळेच सांगते.---अद्वैतुल्लाखान