मा. धूपकरजी शेखरजी यांचा लेख मनापासून आवडला. आणि त्यांनि वापरलेला थोबाडपुस्तक हा शब्दही. सकाळी उठल्याउठल्या थोबाडपुस्तकाला आपले थोबाड दाखवण्याची आजकालच्या तरुणांना घाई झाली असते. उभ्या आयुष्यात ज्यांचे कधी थोबाड पाहिले नसते किंवा पाहिले जाण्याची शक्यता नसते, त्यांच्या खासगी बाबी सार्वजनिक व्यासपीठावर ठेवायच्या, याने काय फायदा होतो ते अजून समजलेले नाही. माझ्या श्रीमुखपुस्तकावर येऊन लघळपणा करणाऱ्या अनेकांना मी थोबाडून काढले आहे.
अवांतर : आपले ते श्रीमुख आणि दुसऱ्याचे मात्र थोबाड! ---अद्वैतुल्लाखान
(संपादित : प्रशासक)