माहिती बद्दल धन्यवाद चैतन्य. मलाही टग्या म्हणतात तसा ष्टोचा काकडाच माहित होता. लहानपणी गॅस सिलिंडर संपल्यावर तो येईपर्यंत ष्टोवर स्वयंपाक असे. तेव्हा तो काकडा वापरात होता. नंतर दोन सिलिंडरांच्या जमान्यात ष्टो नि काकडा कालबाह्य झाला. असो.

मी माझ्या आईला विचारून पाहिले काकडा म्हणजे काय. तिने सांगितले. तिच्या लहानपणी ती तिच्या आजीबरोबर काकडारतीला जात असे. मला हा प्रकार माहित नाही याचेच तिला आश्चर्य वाटले. कार्तिकात कृष्णाची हर प्रकारे पूजा होते. तुळशीचे लग्न होते. भागवत सप्ताह होतो. त्यातच हा काकड्याचाही प्रकार. थोडक्यात म्हणजे कार्तिक कृष्णस्पेशल महिना आहे. (असे मातेचे म्हणणे. )

बाकी जाड वातीमुळे बराच वेळ दिवा/ आरती चालू राहते का? सगळी गाणी म्हणेपर्यंत ज्योत पेटती ठेवायची का? ही सगळी गाणी पाठ करायची असतात की त्याचे पुस्तक मिळते? गदिमांचेही गाणे आहे म्हणजे नवी नवी गाणी घातली तरी चालतात का?