तुमच्या मातोश्रींनी दिलेली माहिती बारोबर आहे. कार्तिक हा कृष्ण स्पेशल महिना आहे.
आणि जाड वात बराच वेळ जळते. साधारणपणे, कुठल्याही पूजेत, सुरुवातीला लावलेला दिवा पूजा संपेपर्यंत तेवत राहील असे पाहिले जाते.
(यावत्पूजासमाप्तिः स्यात् तावत्त्वं सुस्थिरो भव- अशी दिव्याची प्रार्थना करतात)आणि कापसाची वातही बराच वेळ जळते. (त्यामुळे, खरे तर कापसा ऐवजी कापडाची वात लावायचे कारण नीटसे समजत नाही).
बाकी गाण्यांचं म्हणाल, तर ती पाठच असली पाहिजेत असे नाही, पण पाठ असली तर बरं पडतं. पूजेचे उपचार करता करता म्हणता येतात.
(पुस्तकात बघून म्हणताना, निम्मे लक्ष पुस्तकात, निम्मे पूजेत असे होते)
बाकी गाणी कुठली असावीत असा काही नियम नाही. त्या उपचाराला साजेसं गीत चालू शकतं.
पहाटे देवाला झोपेतून जागं करणं, आणि त्याची वेगवेगळ्या उपचारांनी पूजा करणं इतकंच महत्त्वाचं.