मास्तर हा माझ्या जीवनातला अत्यंत गहन आणि रंगीत विषय आहे त्यामुळे हे लेखन किती वेळ चालेल आणि केव्हां संपेल काही सांगता येत नाही, माझ्याकडे तसा कोणताही आराखडा नाही. हे व्यक्तिचित्र वाटत असलं तरी ते तेवढच नाही, तुमच्या आयुष्याला ते फार जवळून स्पर्शून जाईल. तुम्हाला जर प्रतिसाद द्यायचा तर त्यावेळी त्या कथाभागावर द्यावा लागेल कारण प्रत्येक कथा एका आवर्तनावर संपल्या सारखी वाटते तोवर दुसरं आवर्तन सुरू झालेलं असेल. रोजच्या जगण्यातले अध्यात्माचे गहन पैलू, जीवनाचा मूड सदाबहार ठेवू शकणारं संगीत आणि स्वच्छंद जगण्याची आमच्या दोघांची उर्मी घेऊन हे लेखन येतंय.
संजय