"फॉर एव्हर क्लासीक्स" मधील एक छानशी कविता येथे दिल्याबद्दल धन्यवाद निलहंसा, श्री. भोमे म्हणतात त्या प्रमाणे प्रशासकांमार्फत जरा शीर्षकांत बदल करता आला तर बघावे जेणे करून जुन्या कविता किंवा आठवणीतल्या कविता - उप शीर्षका समवेत जमा करून देता येतील. उप शीर्षक अश्या साठी की, एकदा घेतली गेलेली एका मनोगतीची मेहनत परत दुसऱ्याने न घेता दुसरी कविता देण्यासाठी मागील संदर्भ लक्षांत यावा म्हणून.
माझ्या मतें मनोगतींना जुन्या कवितेंचा आस्वाद घेता यावा हा मुळ उद्देश्य सफल व्हावा व कविता कुणी मनोगता वर टाकली हा दुय्यम भाग झाला
मला आशा आहे श्री. प्रशासक हा प्रतिसाद वाचून आवश्यक तो बदल करण्यासाठी अनुमती देतील.
माधव कुळकर्णी.