मिलन,
डोळे ही रदीफ आणि काही शेर आवडले. संदर्भ स्मरतात डोळे - वा!
'गं कळतात' म्हणण्याऐवजी समजतात/उमजतात डोळे म्हटलं तर?
'अधिऱ्या' मलाही खटकला. 'करा म्यान साऱ्याच आता कट्यारी' असं केलं तर?
मक्ता :
जरी पापण्यांतून झाकून असती
तरी आसवांनीच जळतात डोळे
असा बदल सुचला. इथला 'च' मला जरा खटकतोच आहे, पण जरी तरी मुळे चालून जाईल असं वाटतं.
- कुमार