प्रभाकर,

आपली ही पाककृती वाचली आणि पं.भिमसेन जोशी आठवले. त्यांच्या आवडीची ही डीश!
मी भावनगरला असतांना कुंदाताईंची ओळख झाली होती. त्या तेथे शास्त्रीय संगीत शिकवत असत. एकदा पं.भिमसेन जोशी यांचा गायनाचा कार्यक्रम होता. भावनगरला गेले की ते कुंदाताईंकडे उतरायचे. रात्री ९ वाजता ह्यांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी ६ वाजता हे कुंदाताईंना ऑर्डर देतात..."अग कुंदा! रात्री रावण पिठलं आणि मस्त भाकरी कर". कुंदाताई रागावून त्यांना म्हणाल्या," अहो, तुमचा रात्री कार्यक्रम आहे गाण्याचा आणि रावण पिठलं काय खाताय?"
पं. जोशीं उत्तरले," जो नहीं खायेगा,वो नहीं गायेगा । तू बनव रावण पिठलं." रावण पिठलं आणि भाकरी खावून पं.भिमसेन जोशी कार्यक्रमाला गेले; बहारदार संगीताची मेजवानी रसिकांना देवून परतले. पं. भिमसेन जोशी ह्यांच्या खाण्या-पिण्याच्या काही सवयींवर टिका ऐकली आहे. पण मला त्यांचा आवाज आणि गाणं  आवडतं ऐकायला. काही दिवसांपूर्वी त्यांचा आवाज आणि पं. हरीप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीचे सूर ऐकण्याचे भाग्य नकळत लाभले होते. वर्तमानपत्रात बातमी वाचली होती. ह्या दोन महारथींना पुन्हा असे ऐकण्याची संधी मिळणार नाही म्हणून धावत-पळत येण्याची धडपड कानी लागली. कान आणि जाणिव तृप्त झाली.

ती सुखद संध्याकाळ घेवून घरी परतण्याची धुंदी अनुभवण्याची होती.