कार्यालयातील खोल्यांच्या बाबतीत महित नाही पण, वसाहतीतील इमारतींच्या बाबतीत, माझ्या तर्कानुसार असे असेल.

बी-१, बी-२ मुळे पत्ता लिहायला सोपा आणि सुटसुटीत वाटत असावा, म्हणून प्रथम बी-१ वगैरे. पण मग समजा त्या वसाहतीत एखाद्याची सदनिका स्वतःची असेल, तर त्याला हे घर बी-१ वगैरेमुळं कदाचित "आपलं" असं वाटत नसेल. म्हणून मग त्या इमारतीचा हा आपलेपणा आणण्यासाठी मग हा सर्व प्रकार, कावेरी, शरयू...... आणि मग अगदी भाड्यानं राहणाऱ्यालादेखील ह्या "कावेरी", "शरयू" मुळं आपण स्वतःच्या घरात राहत असल्यासारखं वाटत असेल. बघा ना खाली दिलेले दोन पत्ते वाचाः

कृष्णकुमार द. जोशी                                                   कृष्णकुमार द. जोशी
बी-११, रचना अपार्टमेंट, रत्नाकर बँकेजवळ,        "श्रीकृष्ण", ३३०, ई वॉर्ड, रत्नाकर बँकेजवळ, 
ताराबाई पार्क, कोल्हापूर.                          ताराबाई पार्क, कोल्हापूर.                 

अर्थात असं वाटलंच पाहिजे असा अट्टहास नाही.