प्रतिसादाबद्दल आभार. मात्र "अधिऱ्या" बद्दल आक्षेप का ते नाही कळले. अधिऱ्या कट्यारी म्हणताना "जीव घेण्यासाठी अधीर झालेल्या कट्यारी" मला अभिप्रेत होते आणि "त्यांची गरज नाही, इथे त्याकरता डोळे पुरेसे आहेत", हेच निरूपण होते. 
कुमारजी, "गं कळतात" च्या ऐवजी "समजतात" नक्कीच चालले असते, नव्हे ते जास्त चपखलही वाटतंय. 
पण "असे पापण्यांच्या मी घेतो मिठीत" म्हणताना "कुणाला? " हा प्रश्न पडावा अशी अपेक्षा होती आणि "जरी आसवांनी हे जळतात डोळे" म्हणताना त्याचा रहस्यभेद होतानाच पाण्यानेही आग लागते हे सुचवायचे होतें.