आहे. की-बोर्डचे अनेक फायदे आहेतः

की-बोर्ड पोर्टेबल आहे, त्याला रिदम असतो, त्याला वेगवेगळे टोन्स असतात, की-बोर्ड पॉवरबेस्ड आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्केलचेंजर असतो म्हणजे तुम्ही तुमच्या आवाजच्या पट्टीला (किंवा गायकाच्या) तो सेट करू शकता.

मी अत्यंत दर्दी समजल्या जाणाऱ्या सॅबेस्टीयनचा पियानो एकला आहे (त्याची हिंदी गाणी सर्वांनी एकली असतील ) पण तो गाण्याचं इंटरल्यूड वाजवत नाही (ती वेगळी वाद्यं वाजतात) आणि तो गाण्याची ट्यून वाजतो (आता माझा सॉलिड अभ्यास झालाय), शब्द वाजवत नाही कारण तेवढा हात फक्त हार्मोनियमवरच चालू शकतो पियानोवर चालणं शक्यच नाही. 

आता वाद्याच्या बाबतीत  आणखी एक फार मजेशीर गोष्ट आहे, ते कुणाच्या हातात आहे यावर मेलडी ठरते, म्हणजे बासरी कुठली आहे त्यापेक्षा हरिप्रसाद वाजवतायंत यानी सगळा नूर बदलतो कारण मेलडी वाद्यात नाही, तुमच्यात आहे! आणि या लेखांचा हेतू ती जागवणं आहे!

संजय