मंदार मोडक आणि विजय देशमुख यांस,
अलीकडे म्हणजे साधारणपणे गेल्या दोन आठवड्यांपासून झी मराठीवरील जाहिरातीतला मजकूर बदलला आहे. त्यातील बाबर हुमायून नि अकबराविषयीची माहिती जाऊन त्या ठिकाणी "ठिपकेवाला तो चित्ता. आणि पट्टेवाला? " आई म्हणते, त्यावर मुलगी म्हणते, "टायगर! " हे शब्द आल्याचे आपल्या लक्षात आलेच असेल. (तरीदेखील एखाद्या वेळेस मूळ मजकुराची जाहिरात येतेच. ती चुकून येते की चूक कंपनीकडून मुद्दाम केली जाते हे समजायला मार्ग नाही).