परदेश प्रवासाला, नि तेही एकट्यानी जाताना, मनावर जे दडपण येतं त्याचं यथार्थ वर्णन आपल्या लिखाणात आहे.
मात्र तिसऱ्या परिच्छेदाच्या शेवटी शेवटी असलेल्या, "इतर अनेक वेळा त्यांच्याकडे येऊन राहणाऱ्या त्यांच्या आईने यावेळेस मात्र नाही सांगितल" या वाक्यात, "त्यांच्याकडे" ऐवजी "आमच्याकडे" आणि "त्यांच्या आईने" च्या ऐवजी "ह्यांच्या आईने" असे शब्द असायला हवे होते. ("त्यांच्याकडे" हा शब्द तसाच ठेवला तर वाक्यातून होणारा बोध वेगळा असेल).
दुसरी गोष्ट म्हणजे, सदर वाक्यातून तुमची सासूबाईंविषयी नाराजी डोकावते. हे लिखाण त्यांनी वाचलं तर त्यांना हे वाक्य खटकण्याची शक्यता आहे. (लेखकानी अशाही गोष्टींचं भान ठेवावं असं मला वाटतं. )