आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
काही गोष्टींचा खुलासा करू इच्छीते.... ह्या लिखाणात "परदेश प्रवासाला एकट्याने जातांना मनावर येणारे दडपण" हा मुख्य मुद्दा नसुन, मानवी नात्यातल्या गुंतागुंतीची गुंफण" हा मुद्दा महत्त्वाचा आहे."सगळे जवळच डोंबिवलीत राहणारे पण मदतीला येउ शकले नाही........"," जे नातेवाईक सोडवायला येणार होते त्यांना प्रवासाचा दिवसच लक्षात नव्हता...... ", "जवळची नातेवाईक शुभेच्छाचा फोनही करायलाही विसरली...... ", किंवा "एक नातेवाईक खुप वेळ गप्पा मारत होती........ " या पार्श्वभुमीवर धुणी भांडीकरणारी ती म्हणजे सारया दिवसभर कामात असणारी...... तरीही कथेतल्या तीच्यासाठी वेळ काढणारी, तीच्या बरोबर दवाखान्यात जाणारी, तिच्यासाठी चहा करणारी, पोळी-भाजी करणारी आणि म्हणुनच दुरच्या प्रवासाला निघालेल्या तीच्या मनात जवळच कोण आणि दुरच कोण हा संभ्रम निर्माण झाला आहे, हा खरा कथेचा गाभा! आणि म्हणुनच भेट देउन मनातली कृतज्ञता व्यक्त करण!
परदेशात एकटीजाणारे "ती" म्हणजे दिप्ती जोशी नव्हे, म्हणून कथेतल्या तीच्याकडे येउन राहणारया म्हणून "त्यांच्याकडे". एखादी गोष्ट खरी घडली असेल तर ती सांगतांना आपण प्रामाणिक असलो की समोरच्याला राग येण्याचा प्रश्न येत नाही.
"इतर अनेक वेळा त्यांच्याकडे येऊन रहाणाऱ्या सासुबाईंनी यावेळेसमात्र नाही सांगीतल" म्हणजे जी घटना जशी घडली तसे वर्णन......!, कथेतली ती अस तर नाही म्हणत ना की "त्या आल्या नाहीत मला राग आला, किंवा हे काय वागण इतर वेळेस तर येतात माझ्याकडे रहायला, मग आत्ता कां नाही? " असा उल्लेख केला असता तर सासुबाईंना राग येऊ शकतो.
असो. चुकभुल द्यावी-घावी......... दीप्ती जोशी