हिंदीतला आदरार्थी जी नामाला चिकटून येत नाही. उदा. राम जी, हनुमान जी, प्रधान जी वगैरे. याव्यतिरिक्त, हिंदीत एखाद्याने केलेली विधाने ऐकताना त्याला संमतिदर्शक म्हणून हाँ जी किंवा जी हाँ म्हणायची पद्धत आहे. कोणती पद्धत वापरायची ते बोलणारा हिंदीच्या कुठल्या पट्ट्यातून आला आहे त्यावरून ठरते.
मराठीत 'जी' विविध अर्थाने येते. १. 'ओ'ऐवजी, कनिष्ठ माणसाने वरिष्ठाच्या हाकेला दिलेला प्रतिसाद. जी हुजूरमध्ये तो अर्थ आहे.
२. संमतिदर्शक 'हो'ऐवजी (कनिष्ठाने)दिलेला होकार.
३. अहो अशा अर्थाने अजीचे लघुरूप.
४. पोवाड्यांत पादपूरणार्थी.
५. नामाचा, विशेषणाचा किंवा एखाद्या शब्दाचा हिस्सा म्हणून 'जी' हे अक्षर येऊ शकते. उदा. शिवाजी, दाजी, बाजी, आजी, काजी, पाजी, राजी वगैरे.
मराठी माणसांच्या बाबतीत हिंदीभाषक 'जी'च्या उपयोगाने अनेकदा विनोद(? ) निर्माण करतात. उदा. शिवाजी जी, आजी जी, लता जी(म्हणजे लताआजी(!) वगैरे.
व्यक्तिनामाला चिकटून 'जी' लावायची पद्धत मराठी नाही. बाळजी गंगाधरजी टिळकजी, किंवा सावरकरजी-अत्रेजी असे कधीही म्हटलेले ऐकले नसेल. मराठीतले आदरार्थी प्रत्यय, राव, साहेव, रावसाहेब, पंत, बा, दाजी, नाना, दादा, भाऊ, अण्णा, अप्पा, बाई(साहेब), ताई(साहेब), माई(साहेब), काकू, मावशी, आजी हे आहेत. त्यांत 'जी' नाही!
(स्त्रियांच्या बाबतीत, स्त्रीचे वय आणि पद नक्की माहीत नसेल तर असली उपपदे लावण्याच्या फंदात पडू नये.)