चैतन्य, हरिभक्त आणि आशुतोश,

अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

चैतन्य, 'कृत्तिका' नक्षत्राचा कार्तिक या नावाशी संबंध आहे, असा एक उल्लेख वाचनात आला, तसेच, कार्तिक किंवा सुब्रमण्यम स्वामीचा ही संदर्भ सापडला, मात्र या दोन्हीबद्दल पुरेशी माहिती न मिळाल्याने लेखात त्यांचा समावेश करणे टाळले. तुम्ही नोंदवलेला "त्रिपुरारी" पौर्णिमा हा उल्लेख योग्य आहे. (स्वतःच स्वतःच्या लेखाचं 'मुद्रितशोधन' करणं खरंच अवघड आहे!)

हरिभक्त, रमणाश्रमच्या दुव्यावरून दक्षिणेतही या महिन्याचे बरेच महत्त्व असल्याचे दिसते. आभार.

आशुतोश, मनोगतींबद्दलच्या अभिप्रायाशी १००% सहमत :).