सर्व रसिक वाचकांस मनःपूर्वक धन्यवाद.
श्री. कारकून,
(सरकारी खात्यात खर्डेघाशी करीत निवृत्त होईल असा)
माझे वाक्य आपल्याला लागलेले दिसते आहे. क्षमा असावी. परंतु, ते माझे वैयक्तिक मत नसून महा मेटाकूटीने महिन्याची दोन टोके जुळविण्यात आयुष्य खर्ची घातलेल्या आणि मुलाच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या, मध्यम वर्गीय स्त्रीचे नवऱ्याला माफक प्रमाणात डिवचण्याचे एक साधन आहे. अर्थात तेही तिच्या मनापासूनचे नाही, हे तिच्या, नवऱ्यावरील, प्रेमातून दिसून येतेच. असो.
श्री. प्रवासी,
भाग दोन लवकरच देत आहे.
श्री. भोमेकाका,
'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्ये श्री. कोल्हटकर म्हणातात, 'पृथ्वीवर २/३ पाणी आणि १/३ जमिन आहे. म्हणजेच पृथ्वीचा पायाच पाणी आहे. आणि जोपर्यंत पृथ्वीचा पाया पाणी आहे तो पर्यंत त्यावर जन्म घेणाऱ्या मानवाचा पायाही 'अश्रू'च असणार. दुःख हे शाश्वत आहे बाकी सर्व अशास्वत.'
अर्थात मी निराशावादी नाही पण दुःखांना गौण लेखण्याइतका भाबडा आशावादीही नाही. असो.
श्री. मयुरेश वैद्य,
भाग दोन तयार आहे. लवकरच देईन 'मनोगतावर'.
सर्वसाक्षी,
प्राइम-टाईम मध्ये एकमेकांशी भांडणारी जोडपीही उतारवयात मनाने एकमेकांजवळ येतात असा आशावाद त्यामागे आहे.
श्री. व्यक्तिमत्त्व,
हे, लेखकाचे अनुभव, निरिक्षण आणि कल्पनाशक्तीचे मिश्रीत ललीत लेखन आहे. आपल्याला भावले हे वाचून श्रमसाफल्याची भावना मनात जागी झाली.
श्री. माधव कुळकर्णी,
भाग दोन लवकरच 'मनोगतावर' देत आहे.
सुवर्णमयी,
धन्यवाद. जास्त वाट पाहावी लागणार नाही.
धन्यवाद अनु,
'पारिजातका'चा गंध अजून मनावर रेंगाळतो आहे हे मी त्या कथेचे यश मानतो. 'तिन्हीसांज', ही उतारवयातील जोडप्याच्या भावबंधाची कथा आहे. वाचकांच्या मनाला भिडली तर ही कथाही चिरंजीव होऊन जाईल. भाग दोन लवकरच देत आहे.
श्री. नीलहंस,
फार मोठ्या प्रतिभावंत लेखकाच्या निर्मितीशी तुम्ही 'तिन्हीसांच'ची तुलना करीत आहात. हे तुमचे प्रेम आहे, तरी पण, मला माझ्या मर्यादा ठावूक आहेत. आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सर्वांस पुनश्च धन्यवाद.