मला मान्य आहे. मूळ पाककृती तशीच आहे. परंतु मी दिलेली आवृत्ती माझ्या चवीनुसार 'सुधारीत' आहे. मी कुसूमचे 'रेशीमपत्ती' तिखट वापरतो. ते बऱ्यापैकी तिखट असते. सर्वांना 'मजा' लूटता यावी म्हणून अर्धीवाटीच तिखट वापरतो. खोबऱ्याच्या किसा शिवाय मला हे पिठले जास्त आवडते. पण आपल्या सूचनेनुसार पिठले बनवायचे असेल तर ते जास्त चवीष्ट आणि अगदी दशमुखी रावण पिठले होईल. असो.