पहिल्या तीन परिच्छेदातला मजकूर तर्कसंगत आणि म्हणून पटण्यासारखा आहे. नंतरच्या परिच्छेदातले विचार काहीसे विस्कळीत वाटतात. उपास या आहारपातळीवरील रिक्तता, मनात असो वा नसो पण निसर्गक्रमाप्रमाणे सहज होणारी गोष्ट आहे, कष्टसाध्य नाही. उलट शब्दांच्या व वाणीच्या त्यातल्या त्यात शब्दांच्या पातळीवरची रिक्तता मात्र सहजसाध्य नाही. माणूस शब्द उच्चारायचं थांबवू शकेल. शब्द निर्माण होण्याचं थांबवणं फार कठीण. ते जमलं तर आंतरिक शांततेचा (जेस्टाल्ट थेरपीत त्याला इन्टर्नल सायलेन्स म्हणतात ) उदय होतो. त्यामुळे अनुभवाची तीव्रता कित्येक पटीनी वाढते(शब्दांचा आडपडदा दूर होत असल्यामुळे असेल कदाचित) असे म्हणतात.