सधारणपणे आवडणाऱ्या नि न आवडणाऱ्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी लक्षात राहतात. त्यातल्या त्यात ज्या गोष्टींशी राग, द्वेष, न्यूनगंड, अशा नकारात्मक भावना निगडीत असतात त्या ज्यास्त काळ लक्षात राहतात. त्याची नकळत पुन्हापुन्हा आठवण होत राहते. त्यामानानी चांगल्या गोष्टींची स्मृती अल्पकाळ टिकते. त्यामुळेच "येनकेन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत" हे सुभाषित आलंय. तात्पर्य, दीर्घकाळ लक्षात राहिलेली गोष्ट चांगली नसण्याचीच शक्यता अधिक.