'पोकळी', 'शुन्यावस्था' ही अतिशय कष्टसाध्य आहे, अगदी बरोबर आहे, आता बघ......

वाणीचे मौन - तोंडाने एकही शब्दही बोलायचा नाही पण मनात मात्र विचारांची गर्दी आहे हे मौन होऊ शकेल  का?  किंवा

उपवास - हे आहाराचे मौन, त्यात कडकडीत म्हणजे विचारायलाच नको, भुकेने जीव व्याकुळ झाला  की  मग मनातल्या मनात अनेक चविष्ट पदार्थांची यादी तयार होते, डोळ्यासमोर ते पदार्थ दिसायला लागतात, हे आहाराचे मौन होउ शकेल का?

शुन्यावस्था ही अतीशय कठिण अवस्था आहे या तुझ्या विचारांची मी पण सहमत आहे. खुप छान लिहिलेस.

या संदर्भात विमलाजी ठकार यांचे "आत्मोल्लास" हे पुस्तक वाचायला मिळाले तर जरुर वाच, विमलाजींच्या शुन्यावस्थेच्या प्रवासाचे अप्रतिम विवेचन, आपणही या शुन्यावस्थेच्या अभ्यासाला लागतो इतके सुंदर.