शुद्धिचिकित्सकाचा वापर मनोगतींनी अवश्य करावा अशी माझी इच्छाच नव्हे तर आग्रह आहे. पण तो वापर डोळसपणे करावा असे  माझे सांगणे आहे. "शुद्धिचिकित्सक आहेच, तो चुका सुधारेल. मग शुद्ध लिहिण्यासाठी मी कशाला डोक्याला ताण देऊ?" असा विचार करून मजकूर पाठवला तर मजकूर सुधारेल पण आपले शुद्धलेखन सुधारणार नाही. म्हणून शुद्धलेखन सुधारण्याचा पण स्वतंत्रपणे प्रयत्न करावा. (जे करत असतील त्यांनी वरील मजकुराकडे कृपया दुर्लक्ष करावे!)

("स्पेलचेक मुळे हल्ली माझा स्पेलिंगांच्या बाबतीतला आत्मविश्वास गेला आहे, किंवा कॅलक्युलेटरमुळे पाढे विसरायला झाले आहे." ही मी ऐकलेली वाक्ये आहेत. तेव्हा इथे असा प्रकार होऊ नये एवढीच इच्छा. )