पुण्यात चांगल्या म्हणाव्या अशा मराठी शाळा कमीच उरल्या आहेत -अक्षरनंदन, बालशिक्षण, अभिनव आणि ग्राममंगल ही नावे मला माहित आहेत.
पण मुख्य म्हणजे प्रश्न हा पुण्यातल्या शाळांचा नाहीये - महाराष्ट्रात इतरत्र लोकांना आपल्या मातृभाषेतून शिकता येण्याचा पर्याय असावा, किंबहुना शासनाने त्यांना तसे करण्यास प्रोत्साहन द्यावयास हवे.. ते राहिले बाजुला! म्हणून हे आंदोलन.