आपणच मूळात शून्य आहोत त्यामुळे आपण काही करण्याचा प्रश्नच येत नाही असं खरं उत्तर आहे, पण आपण शून्य आहोत हे आपल्याला मान्य नाही, आपण स्वतःला व्यक्ती समजतो आहोत एवढाच पेच आहे!

कोणतंही कृत्य केवळ शरीर आणि मन याच पातळीवर होतं आपण जसेच्यातसे राहतो, अस्पर्शीत राहतो, ही अध्यात्माची फलश्रुती आहे.

"अशा रीतीने रिक्तता, पोकळी, शून्यता या गोष्टी नगण्य नसून अतिशय कष्टसाध्य आहेत"

कष्टसाध्यचा प्रश्न येतोच कुठे? आपण मुळात शून्य आहोत म्हटल्यावर काय साधायचंय?  स्वरूप ही वस्तुस्थिती आहे साध्य नाही.

"नीट पहाल तर आयुष्य हाच एक रिकामा वेळ आहे"

निश्चीतच! पण आपण शून्य आहोत हा बोध झाला तरच तो रिकामा वेळ उपलब्ध होतो, म्हणून तर स्पेस हे टाइमचंच दुसरं रूप आहे, नो टाइम फुलस्पेस (किंवा फुलस्पेस नो टाइम)! ही मोकळीक, हा स्वच्छंदच तर सर्वांना हवा आहे आणि मी त्यावरच आख्खी लेखमाला लिहिली आहे!

"तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये काय करता? "

हाच तर सगळ्यांचा प्रश्न आहे आणि तिथेच चूक आहे. प्रश्न असा हवा 'तुम्ही रिकामी वेळ आहात हे तुम्हाला समजलंय का?' आणि ते जर समजलं असेल तर तुम्ही काहीही करा तुम्हाला मजा येईल! 

संजय