माझे एक स्नेही श्री. निरंजन मिरासदार आहेत ते भरवतात. मी एका कार्यशाळेला उपस्थित राहिलो आहे. टोनी बुझान यांच्या संस्थेतून त्यांनी BLI म्हणजे बुझान लायसेन्सिएट इन्स्ट्रक्टर हा अधिकृतपणे माईंड मॅपिंग शिकवण्याचा परवाना म्हणजे लायसेन्स घेतले आहे.
मी बुझान यांचे माईंड मॅपिंगवरचे एक पुस्तकही घेतले आहे. पण ते फार क्लिष्ट आणि अनाकर्षक आहे. वर किंमत आहे ९.९९ पाउंड. अजून पूर्ण वाचून झाले नाही.
परतू मिरासदार यांची कार्यशाळा मात्र आवडली. ५वीतल्या मुलांपासून रिटायर्ड माणसे यांना उपयुक्त आहे. शिक्षण घेण्याची एक आनंददायक पद्धत असे माझे मत झाले. प्रत्यक्षात एड्यूकेशन + एंटरटेनमेंट = एड्यूटेनमेंट हे त्यांचे सूत्र आहे. तसे त्याबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. मिरासदार यांची परवानगी मिळाल्यास मी मनोगतावर सविस्तर लेख वगैरे टाकेन. ते पीएमपी नामक एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटवरचा कोर्स देखील शिकवतात.
ई मेल आहे venkatesh.edutainment@gmail.com
लौकरच त्यांचे एक पुस्तकही मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांत येत आहे.
सुधीर कांदळकर