सुधीर साहेब आपण फारच सुरेख आणि अगदी व्यवस्थित आढावा घेतला आहेत.
_________________________________________

मी माईंड मॅप "टेस्टेबल" वर्कफ्लोज कागदावर मांडण्याकरता करते.
(१) रिक्वायरमेंट सेशन होतात. रिक्वायरमेंट मध्ये गृहीतके आणि मूळ रिक्वायरमेंटस असतात.
(२) या सोबत आम्हाला इतकी भारंभार माहीती तीदेखील विस्कळीत रुपात मिळते - सिस्टीम वर्कफ्लोज, युझर स्टोरी डायग्रॅम्स वगैरे
(३) या ३/४ मोठ्ठ्या डॉक्युमेंटमधून "टेस्टेबल" वर्कफ्लोज काढून ते डेव्हलपर्स आणि बी ए तसेच नेटवर्क ग्रूप वगैरे या लोकांपुढे आम्ही माईंड मॅप च्या रूपामध्ये मांडतो.
(४) या मॅपस वर खूप "ब्रेन स्टोर्मींग" सेशन होतं. गॅपस सापडतात. आणि सगळ्यांना समाधानकारक असं वाटेल इतपत पूर्ण कव्हरेज शोधलं जातं.
(५) नंतर या मॅपस वरून टेस्ट सिनॅरीओज/टेस्ट केसेस लिहील्या जातात.

ही पद्धत अतोनात उपयुक्त ठरली आहे. टेस्टेड अँड १००% प्रूव्हन!!!