देवदत्त,

आवड पेक्षा व्यवहारही बघीतला जात असावा. बी. एड कशासाठी? शिक्षकाची नोकरी मिळवण्यासाठी. आता भाषेचा शिक्षक म्हणुन भवितव्य काय? या विषयाला नोकऱ्या मर्यादित, त्यात राखीव जागा आहेतच, बरे क्लासेसमध्ये भाषा शिक्षकाला मागणी कमी. शास्त्र, गणित, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इ. च्या शिक्षकाना ती एक संधी असते.

भाषा शिकवण्याची आवड असली तरी आवडिने शिकणारे विद्यार्थि आहेत का? या बाबतित माझ्या बहिणीचा अनुभव फ़ार बोलका आहे. ती राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रिय संबंध या विषयाची प्राध्यापिका आहे. जिथे शिकविते त्या महाविद्यालयाची माजी आदर्श विद्यार्थिनी. चांगले गुण असुनही आवड म्हणुन कला शाखेत प्रवेश घेउन पदव्युत्तर शिक्षण घेतलेली. तिच्या मते आज त्या विषयाची प्राध्यापिका म्हणून तिला मानसिक समाधान अजिबात नाही. कारण मुळात शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन ठरल्याने कला विभागात आवड म्हणुन येणारी मुले फ़ार क्वचित, जी येतात ती सहसा इतरत्र प्रवेश मिळत नाही म्हणुन येणारी. संपुर्ण वर्गात जर दोन विद्यार्थिही असे नसतील कि ज्यांनी साधे वर्तमानपत्र संपूर्ण वाचले आहे आणि ज्यांना देशातिल व जागतिक घडामोडींमध्ये स्वारस्य आहे वा किमान जाणिव तरी आहे. अशा परिस्थित शिक्षकाला काय समाधान असेल? मग शिक्षकी पेशाकडे तेही भाषा विषया मध्ये कोण जाइल?