धन्यवाद. 'नवशोध' हा इनवेन्शन ह्या नामासाठी चांगला शब्द आहे. निश्चित वापर करीन. 'इनवेन्ट' ह्या क्रियापदासाठी शोध लावणे हा पर्यायही कोशात सुचविण्यात आला आहे.  तोही चांगला वाटतो आहे.  ह्या लेखासाठी मी मनोगताच्या पारिभाषिक कोशाचा मुक्तहस्ताने वापर केला आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.

त्यानुसार कृपया संपादकांनी खालील बदल करावेत ही विनंती.

१.
एखादा संशोधक नवे औषध शोधतो1 (प्रॉडक्ट) किंवा औषधनिर्मितीची नवी प्रक्रिया (प्रोसेस) शोधतो तेव्हा तोही बौद्धिक संपदेची निर्मिती करत असतो. अशा निर्मितीसाठी भारतीय पेटंट कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

ऐवजी खालील उतारा टाकावा

एखादा संशोधक औषधाचा शोध लावतो  (प्रॉडक्ट) किंवा औषधनिर्मितीच्या नव्या प्रक्रियेचा (प्रोसेस)शोध लावतो तेव्हा तोही बौद्धिक संपदेची निर्मिती करत असतो. अशा निर्मितीसाठी भारतीय पेटंट कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

२.
संरक्षण प्राप्त करून घेऊ शकता येता.
ऐवजी
संरक्षण प्राप्त करून घेऊ शकता येते