पारिभाषिक कोशात व शासन व्यवहार कोशात नवशोध असा प्रतिशब्द असला तरी तो पटत नाही. 'नव' लावले तरी शोध तो शोध. शोध हा आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा असतो. इन्व्हेन्शन हे आधी अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचे असते. एक वेळ त्यास नवनिर्माण हा प्रतिशब्द चालेल पण नवशोध ? अर्थात 'नवशोध'ला आधीच कोशमान्यता मिळालेली असल्यामुळे ह्या चर्चेस तसा फारसा अर्थ नाही.