विंडोज एक्स.पी. व त्यापुढील विंडोज संस्करण किंवा अद्दयावत लिनक्स वापरणाऱ्यांना मराठी टंकलेखनासाठी विशेष सॉफ्टवेयरची गरज नाही. विंडोजमध्ये कंट्रोल पॅनलमधून मराठी आय.एम.ई संस्थापित करून व लिनक्समध्ये आयबस वापरून मराठी टंकलेखन करता येते.
हे मराठी टंकलेखन अगदी वर्ड-एक्सेल-पॉवरपॉईंटच काय तर याहू मॅसेंजर, गूगल टॉक इ. मध्येही वापरता येते. तसेच विंडोजमध्ये मी फाईल्सची नावेही मराठीतून देऊन पाहिली आहेत, पण काही प्रोग्रॅम्समध्ये त्यामुळे समस्या उद्भवते.
मात्र विंडोजमधील मराठी टंकलेखनाचा कीबोर्ड लेआऊट थोडा विचित्र आहे. लिनक्सध्ये फोनेटीक लेआऊट उपलब्ध आहे.