सगळी खरेदी झाल्यावर घरी यायचं, ह्याला-त्याला दाखवायचं, मग लक्षात येतं की घेतलेल्या वस्तूत काही तरी खोडी आहे की मग जीवाचा आटापीटा करत एक दिवस परत दुकानात जायचं (रिसीट नसतेच), तिथं हुज्जत घालत काही तरी भलतीच वस्तू बजेटमध्ये बसवायची आणि घेऊन यायची, मग हुश्शं करायचं! मी आता फार दमलेयं तुम्ही बाहेरून काही तरी आणा असं नवऱ्याला सांगायचं, मग जरा कुठे आनंदात  दोन घास खाल्ले की आता मला काय हवं याची चर्चा सुरू! बायका आहेत म्हणून सगळ्या इंडस्ट्रीज् चालल्या आहेत आणि अर्थव्यवस्था सक्रीय आहे!

मी काल पँटलून्समध्ये थेट ओपनींगच्या दिवशी गेलो होतो. तेच मेगा-स्टोअर ( इतक्या मोक्याच्या लोकेशनला असून सुद्धा- आयसीसी ट्रेड टॉवर!) चालत नाही म्हणून तिसऱ्यांदा या कुण्या नव्या माणसानी घेतलयं! पाहतो तर काय? तीच ज्युवेलरी, तेच रेफ्रीजिरेटर्स, तेच कपडे, कॅमेरे, टीव्ही सेटस् कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त नव्यानी मांडून ठेवलेत! इतकं न लागणारं उत्पादन झालंय करणार तरी काय त्याचं? पण एक नक्की बायको मला घेऊन गेली होती!

संजय