आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत. त्या पदावर जर कोणी असेल तर त्या इसमाला सुट. शेवटचे नाव रॉबर्ट वाढरा नामक ईसमाचे आहे. आता हा रॉबर्ट वाढरा कोण. त्याने असे काय केले की त्याला सुट आहे. भारतात जर अजून कोणी त्याच नावाची असतील त्या सगळ्यांना सुट आहे का. अजून कोण कोण पात्र होतील त्या सुचीत नाव सापडण्या योग्य. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर इत्त्यादीं चे नाव येऊ शकते का.